महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ बिल्लाळी संचलित परिवर्तन निवासी मुकबधिर विद्यालय, मुक्रमाबाद ता. मुखेड जि. नांदेड महाराष्ट्र पिन-431719 मध्ये आपले स्वागत आहे.
मुक्रमाबाद सारख्या ग्रामीण व लेंडी प्रकल्पामुळे पुनर्वसीत दुर्लक्षीत भागामध्ये 1995 मध्ये बरेच मुले ऐकू व बोलू शकत नसल्याने त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण झालेला होता. महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ बिल्लाळी संस्थेचे परिवर्तन निवासी मुकबधिर विद्यालय मुक्रमाबाद या विशेष शाळेमुळे बहिरे व मुके असणाऱ्या या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांच्या आयुष्यात एक नवीन दिशा देण्याचा मार्ग आहे.
शाळेचे नाव: महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ बिल्लाळी संचलित परिवर्तन निवासी मुकबधिर विद्यालय मुक्रमाबाद ता. मुखेड जि. नांदेड
शाळेचा प्रकार: मूकबधिर निवासी
मान्यता बोर्ड/शासन: महाराष्ट्र शासन
इयत्ता: पूर्व प्राथमिक एक ते चार व इयत्ता पहिली ते इयत्ता सहावी पर्यंत.
शाळेमध्ये शिक्षण घेवून काही विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय चालवीत आहेत. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थी सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत असतात.