आमच्याबद्दल
महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ बिल्लाळी ता. मुखेड जिल्हा नांदेड ही संस्था 1990 मध्ये बिल्लाळी येथे स्थापन करण्यात आलेली एक स्वयंसेवी संस्था आहे.
संस्थेअंतर्गत सन 1995 मध्ये मुक्रामाबाद सारख्या त्या काळातील ग्रामीण व दुर्गम भागामध्ये असणाऱ्या व लेंडी प्रकल्पामध्ये ज्या शेतकऱ्यांची शेती गेली अशा शेतकरी कष्टकरी कामगारांच्या गरीब मूकबधिर विद्यार्थ्यांकरिता निवासी शाळा स्थापन करण्यात आली. तसेच सन 1995 मध्ये मुखेड या शहरामध्ये अस्थिव्यंग विद्यालयाची स्थापना करण्यात आली.
विशेष शाळेचे महत्त्व
विशेष शाळा ही दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची संस्था आहे. जेथे बालकांचे ज्ञान, बुद्धी, संस्कार, विचार करण्याची कुवत घडते. शाळेत विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान दिले जात नाही, तर समाजामध्ये कसे वागावे, जगावे, वडीलधाऱ्यांचा आदर कसा करावा हे शिकविले जाते. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये विशेष शिक्षक यांचे स्थान एखाद्या देवदूता सारखे असते.