अभ्यासक्रम
इयत्ता पूर्व प्राथमिक एक ते चार व इयत्ता पहिली ते इयत्ता सहावी पर्यंतचा अभ्यासक्रम राबविला जातो.
कर्णबधिर विद्यार्थ्यांना विशेष अभ्यासक्रम IEP (वैयक्तिक शिक्षण योजना) नुसार शिक्षण दिले जाते. दिव्यंगाची तीव्रता कमी करण्यासाठी वेळोवेळी श्रवण चाचणी व स्पीच थेरपी वाचा उपचार पद्धतीचा विशेष उपयोग केला जातो.
महाराष्ट्र दिव्यांग शाळा संहिता २०१८ नुसार प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वैयक्तिक शिक्षण कार्यक्रम (IEP) राबवणे आणि मुलांच्या क्षमतांनुसार अभ्यासक्रम आखणे अनिवार्य आहे.